चिमूर तालुक्यात अर्थसाहाय्य योजनेत कापूस व सोयाबीन पिकाचे 27 हजार शेतकरी पात्र

32

7890 शेतकऱ्यांनी अजूनही कागदपत्रे सादर केलेले नाही

पंकज रणदिवे

    नेरी : चिमूर तालुक्यात कापूस पिकाचे  18273 शेतकरी या योजनेत पात्र असून यापैकी 8912 वैयक्तिक खातेदार असून 9361 समाईक खातेदार शेतकरी आहेत तसेच सोयाबीन पिकांचे 8706 पात्र शेतकरी असून यापैकी 4830 वैयक्तिक खातेदार असून 3806 हे समाईक खातेदार आहेत तर सोयाबीन व कापूस पिकांचे एकूण 26979 शेतकरी या अर्थसाहाय्य योजनेत अर्थसहाय्य मिळण्यास पात्र आहेत मात्र 19089 पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे कृषी विभागाकडे सादर केलेले आहेत पण 7890 शेतकऱ्यांनी अजूनही कागदपत्रे सादर केलेले नाहीत  तेव्हा सदर कागदपत्रे कार्यक्षेत्रातील कृषिसहायक यांच्याकडे जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

.      खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अर्थसाहाय्य या योजनेचा लाभ दिला असून सोयाबीन व कापूस पिकांचे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेकटर प्रमाणे दोन हेक्टर पर्यत मर्यादित लाभ मंजूर केला आहे सदर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रा प कार्यालयात लागल्या आहेत.  तसेच कृषिसहायक यांच्याकडे गावनिहाय याद्या उपलब्ध आहेत मात्र या योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी वैयक्तिक खातेदार असल्यास विहित नमुन्यातील समंतीपत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे तसेच सामायिक खातेदार असल्यास कोणत्याही एका खातेदारास अर्थ साहाय्य वितरित करण्यात येणार आहे तेव्हा इतर शेतकऱ्यांनी संमतीपत्र व इतरांचे नाहरकत प्रमाणपत्र कृषिसहायक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे मात्र अजूनही चिमूर तालुक्यातील अनेक सोयाविन व कापूस शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर केलेले नाही तेव्हा पात्र शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे सादर करावे असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.

.      जर कागदपत्रे सादर केले नाही तर सदर शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे अशी माहिती दिली आहे तसेच खरीप हंगाम सण 2023 मध्ये ई पीक पाहणी व सातबारा उताऱ्यावर कापूस सोयाबीन पिकांच्या पेऱ्यांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नसल्यास अश्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे च्या पुराव्या सहित तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा सदर बाबतीत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.