जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने “बैल पोळा” उत्साहात

35

चंद्रपुर : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण मोठ्या उत्सवात बळीराजा साजरा करतात. प्रत्येक गावात गावातील परंपरा कायम राखत विविध उपक्रम राबवित भजन पूजन करीत गावातील ग्राम दैवत मारोतीच्या मंदिरात बैल जोडीना सजावट करून बैल पोळा भरविला जातो. गावातील रितीरिवाजाप्रमाणे बैल पोळ्याला सांगता करण्यात येते.

बक्षीस वितरण करताना

.        भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकर्‍यांनी पारंपरिक बैल पोळा सणासह ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. आधुनिक काळात दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत आहे. तर यंत्र शेती परवडत असल्याने आधुनिकीकरणाच्या या युगात यंत्राचे दिवस येत आहेत. नंदोरी येथील बैल पोळा पाहण्यासाठी दूर दुरून नागरिक येत असतात व नंदोरी येथे भरत असलेल्या बैल पोळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

.        शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावुन दिवसभर उन्हातान्हात राबणार्‍या बैलांप्रती कृज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण दिवसेंदिवस बैलांची, सर्जा- राजांची संख्या घटत असल्याने त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. असे असले तरी अनेक गावात बैल पोळ्यासाठी उत्कृष्ट सजावट करणाऱ्या बळीराजा बक्षीस दिल्या जातात. नंदोरी येथे पार पडलेल्या पोळ्यात उत्कृष्ट सजावट म्हणून बक्षीस देण्यात आले.

.        यावेळी चंद्रपूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, सरपंच मंगेश भोयर, ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, सामाजिक कार्यकर्ते दादा झाडे, माजी तंटामुक्ती सदस्य रमेश तिखट, तंटामुक्ती चे अध्यक्ष आशुतोष घाटे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जिवतोडे, सह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.