तलवार बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक

29

बल्लारपूर पोलिसांची कारवाई

आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल

विसापूर : आजघडीला सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. सणासुदीच्या दिवसात घातपात होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये. याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराची याच अनुषंगाने झडती घेतली जात आहे. बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी एका आरोपी कडून तलवार जप्त करून जेरबंद केले.या प्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

.       सदर गुन्ह्यात एका आरोपी ला पोलिसांनी अटक केली आहे.बल्लारपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. या अनुषंगाने पोलिसांनी शोध मोहीम चालू केली. अशातच शहरातील किल्ला वार्डात झाडाझुडूपात तलवार ठेवली, असल्याची माहिती मिळाली. गौरव सुनील कुकूडकर रा.किल्ला वार्ड, बल्लारपूर हा युवक नागरिकांत दहशत निर्माण करण्यासाठी तलवार बाळगत असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. त्याचे कडून लोखंडी तलवार जप्त केली.

.       आरोपीवर हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. हि कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू,उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गाडे, गजानन डोईफोडे, रणविजय ठाकूर, सुनिल कामटकर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, श्रीनिवास वाभिटकर, विकास जुमनाके, लखन चव्हाण, खंडेराव माने, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर यांच्या पथकाने केली.