तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी हरिदास चांदेकर यांची निवड

15

नेरी : ग्राम पंचायत नेरी ची तहकूब ग्रामसभा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे घेण्यात आली. या ग्रामसभेत विषय क्रमांक 2 नुसार तंटामुक्त समितीची निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्ष पदाकरीता सुरेश कामडी व हरिदास चांदेकर याचे नाव सुचविण्यात आले. दोन्ही उमेदवाांपैकी कुणीही माघार न घेतल्याने ग्रामसभेने गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेतला व गुप्त मतदान पद्धतीत हरिदास चांदेकर यांचा बहुमताने विजय झाला.

.     या ग्रामसभेत सभा अध्यक्ष म्हणून सरपंच रेखा पिसे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, पत्रकार तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते निवड झाल्याबद्दल हरिदास चांदेकर तथा इतर 33 पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.