चालत्या बस मध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांला नागरिकांनी दिला चोप

8

राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधील प्रकार

रेल्वे अधिकाऱ्याला केले पोलिसाच्या स्वाधीन

बल्लारपूर येथील समाजमन सुन्न करणारी घटना

बल्लारपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या चालत्या बस मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थीनींचा रेल्वे अधिकाऱ्यांनी विनयभंग केला. याप्रकरणी रेल्वे स्थानक मध्ये कार्यरत उपस्टेशन अधिक्षकाला बल्लारपूर पोलिसांनी बुधवार (दि. २८) रोजी सायंकाळी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे मिर्झा बेग (५२) असे नाव असून तो बल्लारपूर रेल्वे स्थानक येथे उपस्टेशन अधिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

.      देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी यांनी महिलांवरील व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनावरून संतप्त भावना व्यक्त केली. मात्र, अत्याचारांच्या घटना थांबता थांबत नाही. असीच एक घटना बल्लारपूर शहरात घडली. एका अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग राज्य परिवहन महामंडळाच्या चालत्या बस मध्ये केला. याप्रकरणी रेल्वे स्थानक मध्ये कार्यरत उपस्टेशन अधिक्षकाला बल्लारपूर पोलिसांनी बुधवार (दि. २८) रोजी सायंकाळी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे मिर्झा बेग (५२) असे नाव असून तो बल्लारपूर रेल्वे स्थानक येथे उपस्टेशन अधिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

.      बल्लारपूर येथून चंद्रपूर येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने विद्यार्थी जातात. बुधवारी सकाळी विद्यार्थी चंद्रपूर ला जाण्यासाठी बस मध्ये चढले. त्याच बस मध्ये आरोपी देखील चढला. बस धावत असताना आरोपीने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला. मात्र, तिने जाताना घटनेची वाच्यता केली नाही. उगीच बदनामी नको, म्हणून ती गप्प बसली. यामुळे आरोपीची हिंमत बळावली.

.      चंद्रपूर येथील महाविद्यालयातून बल्लारपूर येथे बसने येताना आरोपी देखील त्या बस मध्ये आला. आरोपीची हिंमत बळावल्याने पुन्हा त्याच अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला. हा प्रकार सोबतच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. राज्य परिवहन महामंडळाची बस बल्लारपूर बस स्थानकात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांना बस स्थानकावर बोलावले. आरोपीला पकडून चोप दिला. संयमाचा बांध तुटला. अखेर आरोपीला बल्लारपूर पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले.

.     घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीवर पास्को (८) व ७५ (२) बि एन एस २0२3 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या कायद्यान्वये आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक छाया नैताम करीत आहे.