नागभीड येथील सामूहिक अत्याचारी आरोपींना फाशी द्या

109

नागभीड शिवसेनेची मागणी

नागभीड : मतिमंद महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन नागभीड चे ठाणेदार यांचे मार्फत मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री व गृहमंत्री, पोलीस अधीक्षक, उप-विभागीय पोलिस अधिकारी यांना शिवसेनेतर्फे देण्यात आले.

.       समाजामध्ये बऱ्याच अल्पवयीन मुली, महिला, शिक्षणासाठी, काम धंद्यासाठी बाहेर पडत असतात, आज त्यांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. त्याच पुरोगामी महाराष्ट्रात नागभीड सारखे शांतताप्रिय, उत्सवप्रिय शहर वसलेले आहे आणि याच नागभीड शहरात गत १२ दिवसांपूर्वी एका मतिमंद महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आला. या घटनेने नागभीड शहारावरती न पुसल्या जाणारा कलंक लागलेला आहे. या घटनेतील दोषींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर या दोषींना इतकी कठोर शिक्षा करा की, त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडेल आणि यानंतर कुठलाही विकृत असे कृत्य करायला धजावणार नाही. या मागणीचे निवेदन मनोज लडके शिवसेना तालुका प्रमुख नागभीड यांचे नेतृत्वात उप-विभागीय पोलीस अधिकारी  ब्रम्हपुरी,  ठाणेदार  नागभीड, तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री तथा गृहमंत्री  यांना देण्यात आले.

.       या प्रसंगी तालुका प्रमुख ब्रम्हपुरी नरु नरड, शहर प्रमुख श्रीकांत पिसे, तालुका संघटक गिरीश नवघडे, ब्रम्हपुरी शहर प्रमुख अमोल माकोडे, महिला आघाडी तालुका प्रमुख संगीता फटींग, महिला आघाडी शहर प्रमुख माया मोरांडे, उप-तालुका प्रमुख स्वप्नील मेश्राम, उप-तालुका प्रमुख अस्मिक उरकुडे, उप-शहर प्रमुख आशिष बावनकर, शरद सहारे, सुधाकर बोरीकर, चंदन खापर्डे, किरमिरे ताई,दर्शना मेश्राम, ज्योती पाथोडे, मिलिंद खापर्डे, विनोद लांजेवार, तसेच बहुसंख्येने शिवसैनिक, महिला आघाडी उपस्थित होते.