रानतळोधी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन 

24

 

  • आदिवासी आणि अशिक्षित समाजाला मिळणार निशुल्क आरोग्य सेवा 

वरोरा

.                तालुक्यातील रानतळोधी हा गाव ताडोबा जंगलात होता. या गावाचे पुनर्वसन वरोरा ते चिमूर मार्गांवरील एका प्रशस्त व विस्तीर्ण जागेवर शासनाने केलेले आहे. आदिवासी नागरिकांचा गाव असून अशिक्षितांची संख्या जास्त आहे. मेहनती कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. शासनाने त्यांना पुनर्वसीत परिसरात शेतजमिनी सुद्धा दिल्या आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते तथा आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथील कर्मचारी यांनी ज्याप्रमाणे रानतळोधी गावामध्ये हिरवाई निर्माण करण्याचा संकल्प केला. त्याच प्रमाणे गावातील नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी नागापुरे यांनी 24 आगस्ट 2024 ला सकाळी 9वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे.उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे डॉक्टर चमू आणि परिचारिका आरोग्य शिबिरात उपस्थित राहून नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी करणार आहे. रानतळोधी येथील समस्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी केले आहे.