वाघाच्या हल्यात शेळकी ठार 

9

वाघाच्या वाढत्या हल्यामुळे नागरिक भयभीत 

मुल : तालुक्यातील चिचपल्ली वन परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक ७५२ मध्ये शेळ्या चराई साठी गेलेल्या शेळक्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून दुसर्‍या दिवशी सोमवारी त्या शेळक्याचा मृतदेह वन विभागाच्या अधिकार्‍यांना सापडला. मुनीम रतीराम गोलावार  (४१) रा. चिचाळा असे मृतकाचे नाव आहे.

.        प्राप्त माहितीनुसार मुल तालुक्यातील चिचाळा येथील शेळकी मुनीम रतीराम गोलावार हा नेहमी प्रमाणे शेळ्या चराईसाठी चिचपल्ली वन परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक ७५२ मध्ये घेऊन गेला होता. मात्र सायंकाळ होऊनही तो घरी परत आला नसल्याने घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली. मात्र त्याचा पत्ताच लागला नाही. दुसर्‍या दिवशी सोमवारी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे चंद्रपूर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे चिचपल्ली यांचे आदेशानुसार सोमवारी सकाळी मूल चे क्षेत्र सहाय्यक मस्के, वनरक्षक सूधिर ठाकुर, पवन येसाम्बरे, शितल चौधरी, शुभांगी गुरनुले, अतीशिघ्र कृती दल चंद्रपूर चे कर्मचारी तथा संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, दिनेश खेवले, अंकुश वाणी, रीतेश पीजदूरकर, प्रतीक लेनगुरे, हौशीक मंगर, यांनी मिळून शोध मोहीम राबवली दरम्यान जंगलात त्याच्या मृतदेह छिन्नविन्न अवस्थेत  सापडला. वनविभाग व पोलीस प्रशासना मार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात मुल येथे पाठविण्यात आले. मृतकाच्या पत्नीला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर. वेलमे, यांचे हस्ते ५० हजार रुपयाची तात्काळ आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.

.        यावेळी पि.डब्लू.पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी.खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेशसिंह झिरे संजीवन पर्यावरण संस्था, मूल  वनरक्षक आर.जे.गुरनुले जानाळा, व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.