ब्रम्हपुरी विधानसभेची जागा शिवसेनेसाठी सोडा : नरू नरड

15

ब्रम्हपुरी : आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष व संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभेची जागा शिवसेनेसाठी सोडली पाहिजे. अशी मागणी शिवसेनेचे ब्रम्हपुरी तालुकाप्रमुख नरू नरड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

.      ब्रम्हपुरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संदीप गडम्मवार यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती, पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलो असून ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघासाठी बंडू हजारे यांचे नाव पाठवले आहे. जागा आमच्या वाट्याला आल्यास आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वासही नरडांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

.      या पत्रकार परिषदेत नरू नरड शिवसेना तालुकाप्रमुख गायकवाड सिंदेवाही तालुका प्रमुख, अमोल माकोडे शहरप्रमुख, फाल्गुन मुख्य तालुका संघटक ब्रम्हपुरी प्रमुख, कवळू पिंपळकर उपतालुका ब्रम्हपुरी प्रमुख उपस्थित होते.