बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल

36

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 

अन्य दोन अशासकीय सदस्यांचा निवडीवर शिक्कामोर्तब

विसापूर : राज्य सरकार ने महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व लाभार्थी महिलांची निवड करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष म्हणून वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल यांची निवड पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केली.

.       राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेची प्रभावी व सुलभ अंमलबजावणी करावी, म्हणून विधानसभा मतदार संघ निहाय जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री यांच्या वतीने तीन जणांना अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्याचे निर्देश आहे. त्यातील एकाची अध्यक्ष पदी नियुक्ति करावी, असे म्हटले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची अंतिम यादी निवड करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दोन अशासकीय सदस्य म्हणून पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अलका आश्राम व चंदू मारगोनवार यांची नियुक्ती झाली आहे.

.       या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, बल्लारपूर शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, सरचिटणीस मनिष पांडे, वैशाली जोशी, निलेश खरबडे, समीर केने, राजू दारी, रनंजय सिंह यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.