बल्लारपुरात देशी कट्यासह आरोपीला अटक

28

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

आरोपी कडून सात जिवंत काडतुस जप्त

विसापूर : बल्लारपूर येथील भगतसिंह वार्डातील एका ठिकाणी एक व्यक्ती कंबरेला देशी कट्टा बांधून फिरत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक वेकोलि वसाहत परिसरातील मैदानातून त्याला अटक करण्यात आली. ही घटना गुरुवार (दि. १) आगस्ट रोजी उघडकीला आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित शिवप्रसाद निषाद ( २४ ) रा.भगतसिंग वार्ड, बल्लारपूर आहे.

.     बल्लारपूर पोलिसांनी आरोपी कडून देशी बनावटीचा कट्टा, सात जिवंत काडतुस व एक रिकामी केस जप्त केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृतीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. अवैध व्यवसायिक व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यावर धडक मोहिम राबविण्यात येत आहे. ही कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी सर्व पोलीस ठाण्याला दिले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीची माहिती काढून कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे.

.     या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी व गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेले रोहित शिवप्रसाद निषाद ला अटक करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

.     ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात आणि स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोहवा दिपक डोंगरे, सतीश अवतारे, संतोष येलपुलवार, गोपाल अटकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावळे, गणेश भोयर यांच्या पथकाने केली.