सामान्‍य माणसाच्‍या चेहऱ्यावरील आनंद हेच माझे संचित

31

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

दुर्गापूर, मूल येथे महाआरती व अभीष्‍टचिंतन सोहळा

चंद्रपूर : मी प्रामाणिकपणे आपले कार्य करण्यावर भर देतो. आपल्या कामांमुळे, सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होत असेल तर तेच माझ्या आयुष्याचे संचित आहे, अश्या भावना राज्‍याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

.        ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गापूर येथे महाआरती व अभीष्‍टचिंतन सोहळा तर मूल येथे रूग्‍णांना फळे व भेटवस्‍तुंचे वाटप तसेच कार्यकर्ता स्‍नेहमिलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून मी वाढदिवसाला बाहेरगावी देवदर्शनाला जात होतो; परंतु यावर्षी पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या आग्रहास्‍तव माझा वाढदिवस पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या जिल्ह्यातील बंधू-भगिनींसमवेत साजरा करण्‍याचा निर्णय घेतला.’ दुर्गापूर येथील केसरीनंदन हनुमान मंदिर येथे भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांद्वारा घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पुरग्रस्‍त भागातील नागरिकांना अन्‍नधान्‍याच्‍या किटचे वाटप करण्‍यात आले.

.        ‘अतिवृष्‍टीमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. घरे व शेतीच्या नुकसानाचे पंचनामे त्‍वरीत करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त मदत करण्‍याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांनी सर्वांना संपूर्ण सहकार्य करून त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,’ असेही प्रतिपादन ना. मुनगंटीवार म्हणाले. ना. मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त हनुमान मंदिरात 24 तास श्रीरामचरीत मानसाचे पठन करण्‍यात आले. त्‍याच्‍या समारोपप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते मंदीरात महाआरती करण्‍यात आली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, बंधू-भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

                  मूल येथे रूग्‍णांना फळे व भेटवस्‍तू                                 मूल येथे शुरवी महिला महाविद्यालयातर्फे उपजिल्‍हा रूग्‍णालयातील रूग्‍णांना फळे व भेटवस्‍तुंचे वाटप ना. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शुरवी महाविद्यालयाचे व्‍यवस्‍थापक मंडळ, प्राचार्य, शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

                     स्नेहमिलन कार्यक्रम                                              मुल येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांतर्फे आयोजित अभीष्‍टचिंतन व स्‍नेहमिलन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले, ‘कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्‍या स्‍नेहामुळे मी भारावून गेलो आहे. आपण सर्वांनी मला ज्‍या शुभेच्‍छा वाढदिवसानिमीत्त दिल्‍या, त्‍याच्‍या ऋणातुन मी कधीही मुक्‍त होऊ शकत नाही. परंतु, नागरिकांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी मी पूर्ण शक्‍तीनीशी प्रयत्‍न करेन.’ याप्रसंगी मुल तालुक्‍यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.