ग्रामीण रुग्णालयात तज्ञ सर्पमित्राची नेमणूक करा 

57

झेप निसर्ग मित्र संस्थेची वनमंत्र्याकडे मागणी

ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन

नागभीड : वन्यजीव व पर्यावरण रक्षण यासाठी अनेक सेवाभावी संस्था या कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये तज्ञ सर्पतज्ञ आहेत. शहरात असो गावात कुठेही साप निघाला तर या संस्थाशी नागरिकांकडुन तातडीने संपर्क साधला जातो. साप हा अन्न साखळी मधील महत्वाचा घटक असल्याने आधी दिसताच मारले जायचे परंतु आता तसे न करता सेवाभावी संस्थाच्या सर्पमित्रांना बोलवले जाते. त्यामुळे सापाना जीवनदान मिळते.

.       यासोबतच हे सर्पतज्ञ साप चावल्यावर प्रथमोपचार कसे करायचे,  सोबतच सापाबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य सुद्धा विविध उपक्रमातून करीत असतात. सापाच्या दंशावरून साप विषारी की बिनविषारी हे सुद्धा अचूकपणे सर्पमित्र ओळखतात, त्यामुळे अनेक दवाखान्यात यांची मदत घेतली जाते व  पुढील उपचार केले जातात. हे सर्व कार्य या संस्था निरपेक्ष भावनेने करीत आलेल्या आहेत.

.       सेवाभावी संस्थाच्या या सर्पमित्रांना एक वेगळी ओळख निर्माण व्हावी व ते करीत असलेल्या कार्याचा योग्य सन्मान करीत तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयात या सर्प  मित्रांची ‘तज्ञ सर्पमित्र’ म्हणून मानधन तत्वावर नियुक्ती करावी, तसेच या सर्व संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण व वन्यजीव रक्षणासाठी विविध कार्यक्रम स्वखर्चातून राबवीत असतात. या संस्थांना शासनाकडून कोणतेही निधी मिळत नाही.

.       हे कार्य अधिक जोमाने करता यावे यासाठी शासनाकडून निधी  प्राप्त व्हावा व पर्यावरण पूरक विविध राज्य शासनाचे प्रोजेक्ट या संस्थांना देण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन राज्याचे वनमंत्री व चंद्रपुर जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना झेप निसर्ग मित्र बहू. संस्था नागभीड च्या वतीने देण्यात आले. यासंबंधात झेप च्या शिष्टमंडळाशी मंत्रीमहोदयांनी सविस्तर चर्चा केली व राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले.

.       यावेळी झेप चे अध्यक्ष डॉ. पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, अमित देशमुख, बोरकर, ओमप्रकाश मेश्राम, गुलाब राऊत, विरु गजभे, पराग भानारकर,  सतीश मेश्राम, जितू श्यामकुळे, सलीम शेख, तुषार गजभे, चेतन भोयर, क्षितिज गरमळे, रितेश कोरे, प्रीतम रगडे, करण मुलमूले, प्रणय फुकट, यांची उपस्थिती होती.