देशी पिस्टल बाळगणाऱ्या युवकाला अटक

28

माजरी पोलिसांची कारवाई

२ लाखाचा मुद्देमाल जप्त

कुचना : भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या खाली चारचाकी वाहणात बसून एक युवक आपल्याजवळ पिस्टल बाळगून बसून असल्याच्या गुप्त माहिती वरून गुन्हे शोध पथक माजरी ने त्या युवकाला ताब्यात घेत कारवाई केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

.      जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी व गोळीबार प्रकरण यामुळे पोलीस विभागाची तारांबळ उडाली आहे, सदर गुन्ह्यावर आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहे. या मोहीमे दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली पाटाळा भद्रावती तालुका येथील राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या खाली एक इसम आपल्याजवळ पिस्टल बाळगून चारचाकी वाहन एमएच 02 ए एल 8052 मध्ये बसून आहे.

.        माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सदर इसमास ताब्यात घेत त्याची चौकशी केली, त्यामध्ये 1 देशी बनावटीची पिस्टल व त्यामध्ये वापरण्यात येणारे जिवंत काडतुस आढळून आले. त्या इस्माबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर इसम विरुद्ध पोलीस स्टेशन माजरी येथे भारतीय हत्यार कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी 22 वर्षीय जमिल अयनुल शेख रा. वणी जिल्हा यवतमाळ याला माजरी पोलिसांच्या स्वाधीन करीत एकूण 2 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

.        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, सतीश अवथरे यांनी केली.