अखेर ठाणेदार अमोल काचोरे यांचे कंट्रोल रूम ला स्थानांतर

780
  • कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका 
  • वरोरा पोलीस स्टेशन मधील प्रकार 
  • कोरपण्याचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी वरोरा ठाण्याचा पदभार स्वीकारला 

वरोरा

..          खुनाच्या गुन्ह्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने रविवारी सकाळच्या सुमारास जुत्याच्या लेस च्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या तीन पोलीस शिपायावर कर्तव्यावर निष्काळजीपणा केल्यामुळे रविवारी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली तर वरोराचे ठाणेदार अमोल काचोरे यांची पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले त्यांच्या जागेवर कोरपना चे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मंगळवारी वरोरा पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला आहे .

..         पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीतच आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली यानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी तात्काळ कर्तव्यावर असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. तर सोमवारी रात्री वरोरा ते ठाणेदार अमोल काचोरे यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले. त्यांच्या जागी कोरपणाचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी सकाळी त्यांनी बरोरा पोलीस स्टेशनच्या पदभार स्वीकारला. या प्रकरणात आणखी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिसून येते आहे.

..          सविस्तर असे की, आनंदवन येथे राहत असलेल्या आरती चंद्रवंशी या विवाहित महिले सोबत आरोपी समाधान माळी याचे प्रेम झाले. प्रेमाचे रूपांतर लग्नात करण्यासाठी आरोपी समाधान ने आरती ला समजाविले मात्र आरतीचे प्रेम आणखी दुसऱ्या युवकासोबत झाले. ही माहिती आरोपी समाधान ला मिळाली. आपण आरतीवर इतके प्रेम केले आणि तिच्या सोबतच लग्न करणार होतो मात्र तिने आपल्या प्रेमाचा विश्वासघात केला. त्यामुळे संतापलेल्या समाधान ने आरतीला संपविण्याचा कट केला होता. त्याने मार्च महिन्यात फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन चाकू बोलावला होता. आरतीचे अंधवडील व आई सेवाग्राम येथे उपचारासाठी जात होते. ते उपचाराला कधी जातील याची आरोपी समाधान वाट बघत होता . दिनांक 26 जून रोजी आरतीचे आई-वडील सकाळी सेवाग्राम येथे उपचारासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत आरोपी समाधान आरतीच्या घरी गेला. घरी गेल्यावर काही वेळ तिच्याशी गप्पा मारल्या. आणि तिच्यावर बलात्कार करीत बाथरूम मध्ये तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली होती. याप्रकरणी समाधान ला वरोरा पोलिसांनी अटक केली होती . त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 4 जून पर्यंत सहा दिवस पोलीस कुठली सुनावली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी समाधान कडून आरतीच्या हत्येबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. दिनांक 30 जून रोजी सकाळच्या सुमारास आरोपी समाधान ने पोलीस कोठडी समोर असलेल्या जुत्याची लेस काढून बाथरूम मधील दरवाजाला गळफास लावला. यावेळी पोलीस हवालदार धनंजयवरगंटीवार, महिला पोलीस हवालदार, मनीषा कुत्तरमारे व पोलीस शिपाई नितीन तुराळे कर्तव्यावर होते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ त्यात तीनही पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई केली. तर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची सोमवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले. या प्रकरणात आणखी किती जणांवर कारवाई होतील याकडे लक्ष लागले आहे.