विवेकानंद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धाचे आयोजन

35

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून विवेकानंद महाविद्यालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या सहकार्यातून व भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटनेच्या परिश्रमातून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त बॉक्सिंगच्या स्पर्धा दि. 23 जून रोज रविवारला घेण्यात आल्या.

.      सदर बॉक्सिंग स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटननेचे मार्गदर्शक व संस्थापक अध्यक्ष डॉ बी. प्रेमचंद, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू तसेच माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, जयश्री देवकर, भद्रावती तालुका क्रीडा अधिकारी वरोरा तालुका क्रीडा अधिकारी व बॉक्सिंग प्रशिक्षक विजय डोबाळे, चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव डॉ. राकेश तिवारी, शिल्पा तिवारी, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी उमाटे, पत्रकार प्रा. डॉ. यशवंत घुमे, डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. दिलीप बगडे, ॲड. मिलिंद रायपुरे, संजय गुंडावार, राजू गुंडावार, डॉ. सपना खुटेमाटे, कृत्तांत सहारे, मनोज पेटकर, सोनल उमाटे हेलपिंग हॅन्ड एन. जी. ओ. भद्रावती चे पदाधिकारी, शितल मांडवकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

.      पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजेता खेळाडूंना पदक व ऑलम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना 2-2 नोटबुक देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे आणि सर्व पदाधिकारी, यांचे मार्गदर्शन लाभले.

.      स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. संगिता आर. बांबोडे, वर्षा कोयचाळे, लता इंदूरकर (तिवारी), शुभम जुगनाके, शिवानी रॉय, कोमल वाकडे, पंकज शेंडे, पौर्णिमा शेंडे, खुशाल मांढाळे, प्रियंका मांढरे, रोहन मोटघरे, सीमा बेहरा, पुष्पा नेट्टी, वामन अंडरस्कर, आशिष दुपारे. या स्पर्धेचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी प्रयत्न केले.