जादुटोना विरोधी कायद्याची अंबलबजावणी तातडीने करा – अंनिस ची मागणी

24

नागभीड : 21 जुन रोजी नागभीड तालुक्यातील मौशी येथे आसाराम दोनाडकर यांची जादुटोण्याच्या संशयातून तिघांनी हत्या केली. आणी संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व काही वेळातच आरोपींना अटक करण्यात आली. हत्येचे कारण समोर आले करणी करते म्हणून त्यांना मारण्यात आले. येथे येथील मैंद कुटूंबातील मोठ्या मुलाला मुलबाळ होत नव्हते तसेच घरातील इतर सदस्य हे नेहमी आजारी राहायचे हे सगळं आसाराम दोनाडकर यांनी करणी केल्याने होत आहे असा समज मैंद कुटूंबाचा होता. त्यातूनच हे हत्याकांड घडून आले.

.          या दुर्दैवी घटनेची अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीने दखल घेतली असून गावात भेट दिली व आसाराम दोनाडकर यांच्या घरी भेट दिली. तसेच गावात अनेक ठिकाणी भेटी घेऊन प्रबोधन केले.

.         अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्या नंतर सरकाराला जाग आली व 2013 साली जादुटोना विरोधी कायदा सरकारने पारीत केला मात्र आजतागायत त्याची अंबलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. दरवर्षी जिल्ह्यात जादुटोन्याच्या संशयावरून खून, मारहान, बहिष्कार अश्या घटना घडत आहेत. अजूनही बहुतांश लोक जनजागृतीच्या अभावाने भूत, भानामती, करणी यासारख्या अंधश्रद्धांना बळी पडत आहेत. अश्या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जादुटोना विरोधी कृती आराखडा तयार केला होता त्या साठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या आराखड्याच्या माध्यमातून गावागावात जादुटोना विरोधी कायद्याचे प्रशिक्षण देणे, जादुटोना विरोधी कृती दल स्थापण करणे, गैरसमाजातून जादूटोना विषयी असलेले लोकांचे तंटे सोडवणे, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल, पोलीस प्रशासन यांना प्रशिक्षण देणे इत्यादी या आराखड्यात समावेश होता.

.         मात्र सरकार व जिल्हा प्रशासन यांच्या उदासिनतेमुळे या कृती आराखाड्याचा पाहिजे तसा प्रसार गावात झाला नाही. आणी जनजागृतीच्या अभावामुळे रोजच अश्या छोट्या मोठ्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, महसूल विभाग व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातूम प्रत्येक गावात प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत, गावागावात जादुटोना विरोधी कृती दल स्थापन करणे गरजेचे आहे अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष ऍड. गोविंद भेंडारकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

.         यावेळी या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहसचिव अनिल लोणबले चंद्रपूर जिल्हा, प्रा. बालाजी दमकोंडावार ब्रम्हपुरी ता. संघटक, डॉ. शशिकांत बांबोडे मानसोपचार तज्ज्ञ ब्रम्हपुरी, भाऊराव राऊत सेवानिवृत्त शिक्षक, यश कायरकर नागभिड ता. संघटक, जिवेश सयाम कार्याध्यक्ष तळोधी शाखा, नितीन भेंडाळे युवा संघटक तळोधी बिट शाखा अ.भा.अनीस. यांची उपस्थिती होती.