नाते आपुलकीचे संस्थेने आणि सदस्यांनी केली काजल डोंगरेच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत,जपलं आपुलकीचं नातं!

35

चंद्रपूर : चंद्रपूर आणि परिसरातील अत्यंत गरजू लोकांना नाते आपुलकीची संस्था ही देवदूतासारखे काम करीत असून,अत्यावश्यक वेळी गरजूंना आर्थिक मदत होत असल्याने संस्थेचे कार्य डोळ्यात भरण्यासारखे झाले आहे. संस्थेने यापूर्वीही समाजातील कित्येक गरजवंतांना आर्थिक सहाय्य केले आहे.

.             बामनवाडा राजुरा येथील काजल विठ्ठलराव डोंगरे ह्या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत 94% गुण घेऊन यश संपादन केले,दहावीतही 95% गुण घेऊन ती अव्वल आली होती, तिचे ध्येय आयएएस बनण्याचे आहे. परंतु तिच्या ध्येया आड परिस्थिती आडवी येत आहे, वडिलांचे छत्र नाही, आई खचलेली, पाचवीला पुजलेली गरिबी आणि सांभाळ मावशीने केलेला. अशात नाते आपुलकीचे संस्थेच्या सदस्यांनी ठरवलं की आपण काही मदत करावी, आज संस्थेचे सदस्य शंकर पारखी यांच्या मुलाचा वाढदिवस होता, त्यांनी वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला बगल देत पाच हजार रुपये काजलच्या शिक्षणासाठी देऊ केले, खऱ्या अर्थाने नाते आपुलकीचे संस्था आणि सदस्य यांनी माणुसकी जपली आहे असे दिसते, संस्थेकडून 15 हजारांचा धनादेश आणि पारखी यांच्याकडून 5 हजार अशी रक्कम काजलच्या शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबास सुपूर्द करण्यात आली.

.              याप्रसंगी संस्थेचे सदस्य किशोर कवठे, विश्वास साळवे, किशोर ताजने, खुशाल अडवे, देवानंद भांडारकर, सरपंच बाळनाथ वडस्कर आणि संस्थेचे सल्लागार उमेश पारखी उपस्थित होते.

.              यापुढेही समाजातील गरजवंतांना अशीच मदत ही संस्था अविरत करत राहील यात शंका नाही, संस्थेच्या सर्व सदस्यांचे काजलच्या परिवाराने आभार मानले तर सर्व सदस्यांनी काजल तिच्या आयुष्यात यशस्वी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.