विसापूरच्या बाटनिकल गार्डन मध्ये योगासनाचे गिरवले धडे

34

अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनाचा सहभाग

विविध आसने करून साजरा केला योगा दिन

विसापूर : श्रदेय अटल बिहारी वाजपेयी बाटनिकल गार्डन, विसापूरच्या आल्हाददायक व निसर्गरम्य वातावरणात शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिबिरात दाखल झालेल्यांनी विविध आसनाच्या माध्यमातून योगाभ्यास केला.यामध्ये वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

.        योग ही आपल्या भारताची प्राचीन विद्या आहे.माणसाचे मानसिक व शरीरिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगासनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. निरोगी आयुष्य जगता यावे, म्हणून ही विद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गेली आहे. दरवर्षी २१ जून याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील श्रदेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान मध्ये मध्य चांदा वन विभागातील अधिकारी, कर्मचारी व विसापूर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासनाचे धडे गिरविले. यामध्ये सूर्यनमस्कार, ध्यान, विविध प्रकारचे योगासने आणि डान्सच्या तालावर योगाभ्यास करण्यात आला.

.        विसापूरच्या बाटनिकल गार्डन मध्ये योगासनाचे गिरवले धडेयावेळी मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक आदेशकुमार, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक आनंद रेड्डी, राजुरा वन विभागाचे उपविभागीय अधिकारी पवनकुमार जोंग, श्रेदय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश झाडें, वन विभागातील अन्य कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावून योगाभ्यास केला.