किन्ही येथील १२ वर्षीय मुलीला साप चावल्याने मृत्यू

31

गावतुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला

सिंदेवाही : पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत किन्ही (मुरमाडी) येथील १२ वर्षीय दर्पण गणेश गावतूरे या झोपेत असलेल्या मुलीला रात्री २ वाजताच्या सुमारास एका विषारी सापाने चावा घेतला असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे किन्ही येथील गावतुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.