लोनवाहीत बिबट्याचा हाहाकार

29

२ दिवसांत १४ शेळ्यावर मारला ताव

गावकऱ्यात दहशत

त्या बिबट्याच्या बंदोबस्त करा : गावकऱ्यांची मागणी

सिंदेवाही : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा लोनवाही येथे मागील दोन दिवसांत बिबट्याने चक्क १५ शेळ्या ठार केल्या असल्याने गावात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. सदर बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिला आहे.

.      सिंदेवाही शहरालगत असलेल्या लोनवाही येथे मागील आठ दिवसांपासून बिबट्याची दहशत सुरू होती. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तेथील नागरिक उशिरा पर्यंत बाहेर थांबत नसायचे. त्याचाच फायदा घेत मंगळवारी रात्री रवी अमृत ढोलने यांच्या मालकीच्या ५ शेळया बिबट्याने ठार केल्या होत्या. विशेष म्हणजे त्या पाचही शेळ्या गाभण असल्याने हजारो रुपयांची नुकसान झाली आहे. वनविभागाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने व बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे पुन्हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने महादेव चिरकुटा कुंभरे यांच्या मालकीच्या ९ शेळया ठार केल्यामुळे गरीब व्यक्तीचे हजारो रुपयंचे नुकसान झाले आहे.

.      सदर दोन्ही घटनेमुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. बिबट्याने दोन दिवसात चक्क १४ शेळया ठार केल्या असून सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या वण कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना दमदाटी करीत बोलू न देण्याचा प्रयत्न केला असल्याने वन विभागाप्रती नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने दोन्ही पिडीताना त्वरित नुकसान भरपाई द्यावी. तसेच सदर बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिला आहे.