जादुटोना संशयातून वृद्धाची हत्या

56

तीन आरोपीना अटक

नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना

मार्च महिन्यात याच गावात झाले होते तिहेरी हत्याकांड

नागभीड : जादुटोणाच्या संशयावरून एका 67 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. तीन महिन्या पूर्वी याच मौशी गावात वडिलाने आपल्या दोन मुली व पत्नी ची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा काल नागभीड तालुक्यातील मौशी गावात रात्री 8 च्या दरम्यान ही घटना घडली. मृतकाचे नाव आसाराम दोनाडकर (67) असे आहे.

.       प्राप्त माहितीनुसार आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. यांनतर आसाराम दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहान करण्यात आली. त्यांना बेशुद्ध होत पर्यंत मारहान करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी दवाखण्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली व तीन आरोपींना अटक केली. त्यामध्ये संतोष जयघोष मैंद (26), श्रीकांत जयघोष मैंद (24), रुपेश देशमुख (32) यांचा समावेश आहे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील घटनेचा तपास विजय राठोड करीत आहेत.