सर्व सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्यांने सोडवा – खासदार प्रतिभा धानोरकर

27

खासदार धानोरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

चंद्रपुर : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरीकांनी आपल्या समस्या निवेदनाच्या माध्यमातून खासदार धानोरकर यांना दिल्या. यासंदर्भात खासदार धानोरकर यांनी 20 जुन रोजी सर्व विविध अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकांचे आयोजन करुन नागरीकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.

.        खासदार धानोरकर यांनी 19 जुन रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरीकांकडून प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात 20 जुन रोजी स. 11 वा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वीसकलमी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील शेतीत जाणाऱ्या अतिक्रमीत वहीवाटी रस्ते व पांदन रस्त्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी येत्या 15 दिवसांत ग्रामीण भागातील वहीवाट रस्त्यातील तसेच पांदन रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या सुचना यांनी उपस्थित उपविभागीय अधिकारी यांना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तात्काळ विज जोडणी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी सुरक्षा ठेव भरली असून अद्यापही वीज जोडणी मिळाली नसल्याबद्दल चर्चा करण्यात आली.

.        यावेळी खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या वील जोडणी करीता आवश्यक निधी खनिज निधी किंवा जिल्हा वार्षिक निधीतून उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. तसेच भद्रावती येथील निपॉन स्थित जागेवर होणाऱ्या 20 हजार कोटी प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा होऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच वाढीव मोबदला देण्यासंदर्भात चर्चा झाली. सोबतच नविन प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याची प्रक्रीया तात्काळ राबवावी अशा सुचना देखील खासदार धानोरकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

.        त्यांनतर खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर शहर मनपा आयुक्त यांच्या दालनात चंद्रपूर शहरातील विविध समस्यासंदर्भात 20 जुन रोजी दु. 3 वा. बैठक आयोजित केली होती. यावेळी फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणासंदर्भात चर्चा करुन फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांनी केली. तसेच अमृत योजने संदर्भात राहीलेल्या तात्काळ दुर करुन नागरीकांना सुरळीत पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आयुक्तांना सुचना केल्या. तसेच महानगर पालिका क्षेत्रात मोठे सांस्कृतीक सभागृह उभारण्या संदर्भात प्रस्ताव तयार करुन द्यावा अशा सुचना देखील खा. धानोरकर यांनी केली. यासोबतच शहरातील समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सुचना देखील खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

.        यावेळी बैठकीत खासदार धानोरकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, आयुक्त तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.