खरीपपूर्व हंगामाला सुरवात करताना सतर्कता बाळगावी

28

तालुका कृषी अधिकारी तिखे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

100 मी ली पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

नेरी : या वर्षी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तालुका कृषी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते योग्य भावात खरेदी करावे बीज उगवण व बीजप्रक्रिया पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात येत असून खरीप हांगामाला सुरवात करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी ए तिखे यांनी केले आहे.

.        शेतकऱ्यांनी शंभर मी ली पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये जमिनीमध्ये चार इंच खोल ओलावा निर्माण झाल्यावर पेरणी करावी अल्प पाऊस झाल्यास पेरणी करू नये कारण पावसात खंड पडल्यास दुबार पेरणीची वेळ येऊन आर्थिक परिस्थिती ला सामोरे जावे लागते. बी-बियाणे खरेदी करताना अफवाना बळी पडू नये विकत घेतले बियाणे जतन करून ठेवावे बोगस बियाणे खाते, कीटकनाशके विक्री केल्यास कृषिकेंद्राचे परवाना रद्द करण्यात येते. बियाणे बोगस निघण्यास याबाबत शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करावी. बिल देयकांची व बियाणांची जतन करून ठेवावी. शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता अनेक पिके आंतरपिके घ्यावी. विविध रोगांचे प्रतिकार करतील जादा उत्पादन देतील अश्या आधुनिक वाणाची निवड करावी. बीज प्रक्रिया करावी. मका सोयाबीन कापूस या पिकांना संरक्षण मिळण्यासाठी शेत तळ्याची निर्मिती करावी यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे त्यामुळे रब्बी पीक घेणे सुद्धा शक्य होते.

.       खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाच्या सल्याने कार्य करावे तसेच तालुक्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधवाडा कार्यक्रम राबविण्यात येत असून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या पंधरवाडा कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी ए तिखे यांनी केले आहे.