राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

28

चंद्रपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार महातर्फ शहर अध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्वातून विठ्ठल मंदिर प्रभागातील गरीब व गरजू वि‌द्याथ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विठ्ठल मंदिर प्रभागातील डॉ. रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व नरकेशरी अभ्यंकर शाळा शासनाने बंद केल्यामुळे येथील वि‌द्यार्थी शिक्षणापासून वंचित होत असल्याने व खासगी शिक्षण झेपत नसल्याने यावर वि‌द्यार्थ्यांना मदत म्हणून राहुल देवतळे यांनी पुढाकार घेऊन ४०० वि‌द्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग, नोटबुक, कम्पोंस व इतर साहित्य मोफत वाटप करण्यात आले.

.        कार्यक्रमाचे उ‌द्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल, अध्यक्ष म्हणून हिराचंद बोरकुटे, शहर महिला अध्यक्ष शिल्पा कांबळे, मानवाधिकार संघ गुन्हे शाखेचे राज्यसचिव सुहास पिंगे व युवक अध्यक्ष कलाकार मल्हारम व विठ्ठल रुक्माई जेष्ठ नागरिक कृति मंडळाचे अध्यक्ष बिंदुबाबु बडकेलवार, विठ्ठल व्यायाम शाळेचे अध्यक्ष धन्ना येरेवार, लाला गर्गेलवार, संजय जिझीलवार, अनिल दळणे, सुधाकर गर्गेलवार, परब गिरडकर, वसंता पवार, अंबादास खेडेकर, अभय राऊत, नयन दोईफोडे, राज सिलसिला, गिरीश अंदनकर व विठ्ठल मंदिर प्रभागातील इतर मान्यवर उपस्थित होते.