सरपंच शिक्षण योजनेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

252

ग्रामपंचायत नंदोरी (बु.) चे सरपंच मंगेश भोयर यांनी साकारले संकल्प

भद्रावती : तालुक्यातील नंदोरी (बु. ) चे सरपंच मंगेश उर्फ श्रीहरी भोयर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सरपंच शिक्षण योजनेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.

.      याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच मंगेश उर्फ श्रीहरी भोयर, प्रमुख मार्गदर्शक लोकमान्य महाविद्यालय वरोराचे डॉ. प्रशांत खुळे व रविंद्र शेंडे, प्रमुख अतिथी उपसरपंच उषा लांबट, महात्मा ज्योतीबा फूले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्लेषा जीवतोडे भोयर, प्रा. प्रीती पोहाणे कामडे, रमेश तिखट, भानुदास ढवस, माजी सरपंच शरद खामनकर, विनोद लांबट, घनश्याम ढवस, किशोर उमरे, जयश्री एकरे आणि संगीता एकरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

.      याप्रसंगी जि. प.उ. प्राथ. शाळा नंदोरी (बु.) येथील इयत्ता पहिली ते सातवी मध्ये सर्वोच्च गुणांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे इयत्ता पहिली प्रथम आरोही अवगान, व मानवी दानव, इयत्ता दुसरी विहान आत्राम, इयत्ता तिसरी अर्पित बोनसुले, इयत्ता चौथी स्वरा अवगान, इयत्ता पाचवी खुशी जीवतोडे, इयत्ता सहावी कृतिका राजूरकर, इयत्ता सातवी श्रावणी ठावरी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच म. ज्यो. फुले विद्यालय नंदोरी येथील इयत्ता ८ वी मधील विद्यार्थी नयन नैताम व इयत्ता ९ वी मधील आस्था नागतुरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक रोख रक्कम एक हजार रुपये आणि सन्मान देऊन गौरव करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी दिनेश चामाटे याला शाळेच्या मुख्याध्यापिका अश्लेषा जीवतोडे भोयर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस एक हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.

.      सरपंच शिक्षण संकल्पनेतून इयत्ता दहावीत गावातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कशिश पुनवटकर व इयत्ता बारावीत गावातून प्रथम आलेला विद्यार्थी वृषभ एकरे ह्या दोघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख रक्कम पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आले. शफजू वाढई यांच्यातर्फ लिपिक सतीश जीवतोडे व गुन्मय अंड्रस्कर या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून शालेय दप्तर व सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच गावातील रहिवासी शरद लांबट (शिक्षकेत्तर् कर्मचारी विलोडा शाळा) यांचा चिरंजीव प्रतिक शरद लांबट या युवकाला ‘उत्कृष्ट युवा पत्रकारिता पुरस्कार’ कर्नाटक सरकार कडून प्राप्त झाल्यामुळे त्याच्या मूळ गावी सरपंच मंगेश भोयर यांच्या हस्ते शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ताई ठावरी यांनी केले.