सिंदेवाही तालुक्यात 17 कोटी 31 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

36

तालुका अंतर्गत ग्रामीण मार्ग कात टाकणार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपुर : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था व नागरीक तसेच वाहतूकदारांना होणारा त्रास लक्षात घेता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकासाचा झंझावात कायम ठेवत सिंदेवाही तालुक्यातील अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची मजबुतीकरण व सुधारणा करण्या हेतू शासन स्तरावर पाठपुरावा करून विविध ग्रामीण, राज्य व प्रजिमा करिता 17 कोटी 31 लक्ष रुपयांचा विकास निधी खेचून आणला. आज दि.15 जून रोजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सिंदेवाही तालुक्यातील या विवीध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

.       भूमिपूजन पार पडलेल्या विकास कामांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील मुरपार येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 9 कोटी 56 लक्ष खर्चून राज्यमार्ग 375 जाटलापूर- मुरपार -लोन खैरी -मुल बॉर्डर याची मजबुतीकरण करणे व डांबरीकरण तसेच सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम करणे, नवेगाव चक (फुटकी) येथे खनिज विकास निधी अंतर्गत 45 लक्ष रुपयाचे पोचमार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, चिकमारा येथे अर्थसंकल्प आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 70 लक्ष निधीतून चिकमारा- मांगली ते गुंजेवाही, खैरी येथे अर्थसंकल्प आदिवासी उप योजना अंतर्गत मंजूर 1 कोटी 50 लक्ष निधीतून पवनपार ग्रामीण मार्गाचे मजबुतीकरण व सुधारणा करणे, मोजाब खैरी गावाजवळ अर्थसंकल्प आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर 80 लक्ष निधीतून खैरी गुंजेवाही ग्रामीण मार्गाचे मजबुतीकरण व सुधारणा करणे, पवन पर फाटा येथे अर्थसंकल्प आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर पन्नास लक्ष निधीतून मरेगाव खैरी पवन पर रस्ता ग्रामीण मार्ग 26 किमी रस्त्याचे मजबुतीकरणासह सुधारणा करणे, पवन पार फाटा व गुंजेवाही ग्रामीण रुग्णालयाजवळ अर्थसंकल्प आदिवासी उपयोजना अंतर्गत 80 लक्ष मंजूर निधीतून खैरी गुंजेवाही रस्ता ग्रामीण मार्ग 27 किमी रस्त्याचे मजबुती करण्यासह सुधारणा करणे, मौजा मरेगाव ब्रीज जवळ आदिवासी उपयोजना अंतर्गत मंजूर 3 कोटी निधीतून सावरगाटा ते मरेगाव गुंजेवाही पवनपार खैरी प्रजीमा 80 वर मोठ्या पुलाच्या बांधकामाचे लोकार्पण करणे, आदी विकास कामांचा समावेश आहे.

.       भूमिपूजन पार पडलेल्या मार्गांची मजबुतीकरण डांबरीकरण व दुरुस्तीमुळे तालुक्यातील सामान्य नागरिक, वाहतूकदार यांच्या वाहतूक समस्येला पूर्णविराम मिळणार असून दळणवळणाची जुनी मार्गे कात टाकल्याने आता सिंदेवाही तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. तर माझ्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

.       आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास सा.बा. उपविभाग सिंदेवाहीचे उपअभियंता बी. जे. षटगोपनवार, शाखा अभियंता वानखेडे, राठोड, सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाने, वीरेंद्र जयस्वाल, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिजीत मुपीडवार, गुंजेवाही सेवा सहकारी संस्था अध्यक्ष संजय पुपरेड्डीवार, सचिन नाडमवार, नवरगाव काँग्रेसचे अध्यक्ष सुशांत बोडणे, सचिन सहारे, पंकज उईके, टोणू जयस्वाल, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सीमा सहारे, नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार, निमंत्रिता कोकोडे, संगीता शंकपाल, तथा तालुक्यातील सरपंच, ग्राम पंचायत पदाधिकारी व बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.