आपत्ती व्यवस्थापनासाठी वरोरा महसूल विभागाची यंत्रणा सज्ज

27

आपत्ती व्यवस्थापन टीम चे मार्डा डॅम्प येथे प्रात्यक्षिक

वरोरा : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे नागरिकांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू नये, यासाठी वरोरा तहसील प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी वरोरा तालुक्यातील मार्डा डॅम्प येथे प्रशिक्षण देण्यात आली.

.        अतिवृष्टीमुळे नदी, नाला काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा दरवर्षी मोठा फटका बसतो. यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागू नये, यासाठी  जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या नेतृत्वात वरोरा तहसील कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे.

.       जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या पुढाकाराने यावर्षी नैसर्गिक आपत्ती विषयक शोध व बचाव करिता तालुका निहाय नवीन साहित्याची वाटप करण्यात आले आहे. त्यानुषंगाने तहसील वरोरा येथील मार्डा डॅम्प येथे दिनांक 11 जून रोजी राज्य आपत्ती प्रतिसाद दल सोबत नैसर्गिक आपत्ती साहित्य तपासणी व साहित्य वापराबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

.       सदर प्रशिक्षण मध्ये नवीन प्राप्त बोट, लाईफ बॉय, स्टँडर्ड लाइफ जॅकेट, इन्फ्लेटेबल लाईट, दोरखंड, घरामध्ये तयार करता येईल असे लाईफ जॅकेट, तरंगणारे तरफा, ई साहित्य चे प्रशिक्षण मार्डा येथील धरणावर घेण्यात आले. सदर प्रशिक्षण करिता तालुक्यातील आपदा मित्र, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल, पूरग्रस्त गावचे सरपंच ग्राप सदस्य, पोलीस विभाग यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणामध्ये महिला तलाठी व पोलीस पाटील यांनी नदीमध्ये बोट प्रशिक्षणामध्ये विशेष सहबाग नोंदविला.

.        यावेळी तहसील प्रशासन सोबतच, पोलीस निरीक्षक काचोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शेख, एसडीआरएफ चे निरीक्षक दाते यांचे पथकासह उपस्थिती होती.

.       यावेळी तहसीलदार, वरोरा यांनी प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी व नागरिकांना शासनाच्या पूर परिस्थितीबाबत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना गंभीर्याने घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले तसेच प्रत्येक गाव स्तरावर पोलीस पाटील, सरपंच, ग्राप सदस्य यांनी आपत्तीमध्ये प्रशासना सहकार्य करण्यासाठी स्थानिक स्तरावर युवकांची टीम तयार करावी व प्रशासना सोबत कामकाज करण्यासाठी पुढाकार घेणे बाबत सूचना देण्यात आल्या.