ट्रक चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा होणार पर्दाफाश

49

तेलंगणा राज्यातून एका आरोपीला अटक

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोलीस स्टेशन, वरोरा यांची संयुक्त कारवाई

चंद्रपूर : रस्त्यावर उभे असलेले ट्रक व जड वाहने चोरून त्यांचे चेचीस व इंजिन बदलवून विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या एका आरोपीला तेलंगणा राज्यातून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व वरोरा पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून दोन ट्रक जप्त करण्यात आले.

.       पोलीस सूत्रानुसार वरोरा शहरातील कृष्णानगरी, तिळक वार्ड, येथील सुरेश पवार यांचा हायवा ट्रक घरासमोरून उभा असलेला ट्रक क्रमांक एम. एच. ३४ थी झेड ६९६३ किमंत ५७ लाख रूपये हा दिनांक ०३ जुन रोजी सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान त्याचे घराचे बाजुला उभी करून ठेवली असता रात्रौ दरम्यान कोणी तरी अज्ञात चोराने हॉयवा टिप्पर चोरून नेले अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, वरोरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलीस पथकाने सुरु केला. वरोरा, पांढरकवडा मार्ग हैद्राबाद कडे गेल्याची गोपनिय माहिती मिळताच तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून चोरीस गेलेल्या गाडीचा पाठलाग करीत तेलंगणा राज्यातील जिल्हा महेबुबनगर येथुन आरोपी उस्मान उर्फ चौचु भिंभडा खान, (३३), धंदा-चालक, रा. कंगारका घर क्रमांक ४७, जि. मेवात, राज्य-हरियाणा याचेकडुन पोलीस स्टेशन वरोरा येथुन चोरीस गेलेली टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३४ बी झेड ६९६३ किमंत ५७ लाख रूपये तसेच पोलीस स्टेशन, हिगंणघाट जि. वर्धा येथुन चोरी केलेले टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३२ ए. जे.३६९८ किमंत २८,लाख – रूपये असा एकुण ८५, लाख – रूपयाचे ट्रक जप्त केले.

.       हरियाणा राज्यातुन महाराष्ट्र व इतर राज्यात जावुन ट्रक सारखे जड वाहनांची चोरी करून तेलगंणा राज्यात नेवुन तेथील साथीदारासह वाहनांचे इंजिन व चेचीस क्रमांक तसेच वाहनांचे समोरील क्रमांक बदलवुन वाहने हरियाणा तसेच गुजरात राज्यात पाठवित होते. यापुर्वी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन ६ ते ८ ट्रक चोरी केल्याचे आरोपीनी पोलिसांना सांगितले आहे.

.       सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर, पोलीस निरीक्षक, अमोल काचोरे, वरोरा याचे नेतृत्वात पोउपनि विनोद जी. भुरले, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा /सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोशि/संदिप मुळे, पोशि/विशाल राजुरकर पोलीस स्टेशन, वरोरा यांनी केली आहे.