चंद्रपुरात आज पासून मुनी समाजाचे राज्य अधिवेशन

32

चंद्रपूर जिल्हा मुनी समाजाचे आयोजन

योग आणि अध्यात्मावर होणार मार्गदर्शन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मुनी समाजाच्या वतीने योग आणि अध्यात्मावर येत्या आज व उद्या राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक राम नगर चौक, दाताळा रोड वरील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात होणाऱ्या अधिवेशनात राज्य भरातील मुनी समाजातील विचारवंत मार्गदर्शन करणार आहे, ही माहिती मुनीराज वसंत टोंगे यांनी दिली.

.        राज्य अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात उदघाट्न, प्रकाशन, मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन होणार आहे. आज दुपारी २ वाजता विधान परिषद सदस्य व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाहक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते राज्य अधिवेशनाचे उदघाट्न करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश मुनी समाजाचे अध्यक्ष वसंत टोंगे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऋषिकेश येथील योगी अरुणानन्द् मुनी, राजुराचे माजी आमदार अड. वामनराव चटप यांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान मुनी समाज तत्वज्ञान व कार्य पुस्तक प्रकाशन करण्यात येणार आहे. मुनीराज शिवशंकर घुगुल व मुनीमती विजया घुगुल यांचा सत्कार घेतला जाणार आहे.

.       यावेळी विशेष अतिथी म्हणून राम मस्के नागपूर, राजीव सोनी बुद्धगया, डा. परमानंद प्रयाग, डा. विशवनाथ नंदागवळी भंडारा, अड. मुरलीधर धोटे राजुरा, रामभाऊ टोंगे विसापूर, अश्विनी निमजे नागपूर, विजय टोंगे, प्रभाकर पारखी यांची उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता प्रा. श्यामकुमार डहाले आणि संच संगीत सुधा कार्यक्रम सादर करतील,तर ६ वाजता अंधश्रद्धा निर्मूलन वर आधारित काव्य गायन होणार आहे.

.       तिसरे सत्र दि. १७ जून रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार असून मुनी समाज व योग या विषयावर हंसराज मिश्रा, नलिनी श्रीपाद, रामानंद यादव, पतीराम पारधी, मीरा वाघमारे, संदीप गौरकार यांचे मार्गदर्शन होणार आहे.

.        यावेळी अध्यक्षस्थान मुनीराज बी. एस. उके हे भूषवतील. दुपारी १२ वाजता योग – काल, आज आणि उद्या या विषयावर डा. सुदर्शन दिवसे, डा.अंनता सूर, डा. विजय वर्हाटे, प्रा. नामदेव मोरे व वसंत टोंगे मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी राम मस्के राहतील. पाचवे सत्र दुपारी १ वाजता होणार असून महिलांच्या आरोग्यासाठी योग व आहार या विषयांवर डा. ऋचा पोडे, डा. स्नेहल मासिरकर, डा. प्रमोदिनी मोरे यांचे मार्गदर्शन होणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थान किरण जिभकाटे भूषविणार आहे. सदर अधिवेशनाला समाज बांधवानी सहकार्य करावे, असे आयोजकांनी कळविले आहे.