एसडीआरएफने ४१ स्वयंसेवकांना दिले आपत्ती निवारण प्रशिक्षण

29

माजरी : आपदा मित्र ” योजनेअंतर्गत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एसडीआरएफ मार्फत “आपत्ती निवारण प्रशिक्षण” दिले जात असून यामध्ये पूर, भूकंप, आग इत्यादी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी केलेल्या आपत्ती निवारण कार्यात आपत्ती निवारण आणि बचाव पथकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक तयार करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.

.        दरम्यान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण २०२४ तालुका भद्रावती अंतर्गत पावसाळयात अतिवृष्टी व नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे नुकसान व हानी टाळण्यासाठी भद्रावती शहर तसेच ग्रामस्तरावर सर्व साहित्यासह शोध व बचाव पथक सक्रीय असणे आवश्यक आहे. त्याकरीता जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मार्फत तालुका स्तरावर असलेल्या शोध बचाव साहित्याची ओबीएम रवर बोट, ईन्फाटेबल लाईट, लाईफ जॅकेट, लाईफ बॉयज, टॉर्च, चैन सॉ कटर, ईन्फाटेबल टेंट इत्यादी, एसडीआरएफ टिम मार्फत तपासणी करुन भद्रावती येथील शोध व बचाव पथकाला आपातकालीन साहित्याचे एसडीआरएफच्या पथकाव्दारे प्रशिक्षण बुधवारी सकाळी नऊ वाजता पाटाळा येथील वर्धा नदीवर देण्यात आला.

.        नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टिकोनातून माजरी-पाटाळा जि.प. क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. दरम्यान कोणत्याही आपत्तीच्या वेळी स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वयंसेवक हे समाजाचा एक भाग आहेत आणि घटनास्थळी उपस्थित राहून वेळेत मदत आणि बचाव कार्य करू शकतात. त्यामुळे परिसरातील युवकांना प्रशिक्षण देण्यात आली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान मनगाव, पाटाळा, माजरी, कुचना, नागलोन, पळसगाव, थोरणा, राळेगाव, चालबर्डी या गावातील ४१ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तलाठी टि. के. खोब्रागडे, व्ही. एम. शंभरकर यांनी विशेष प्रयत्न केले.

.       सदर प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शेख, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्या समवयेत मंडळ अधिकारी चिकटे, वाटेकर, दडमल, पत्तीवार, तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी परिसरातील पोहणारे युवक व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.