विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

38

मोटेगाव येथील घटना

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या मोटेगाव येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना (दि 11) मंगळवारी दुपारी 1 वाजता दरम्यान उघडकीस आली. अरुण पतरु शेंडे (51) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

.       मोटेगाव येथील शेतकरी अरुण शेंडे हे 12 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या शेतात गेले साडे बारा वाजता त्यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शेतात कुणीही नसल्याने सदर बाब लक्षात आली नाही. मात्र शेळ्या चारणाऱ्या गुराख्याला एक व्यक्ती शेतात पडलेले दिसले तेव्हा सदर इसमाचा मृत्यू झाला असल्याचा दिसताच तात्काळ गावात भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. तेव्हा तात्काळ गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले व पोलीस विभागाला सूचना दिली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस विभागाने घटनास्थळ गाठीत मृत्यूदेहाचा पंचनामा केला आणि गुन्हा दाखल केला असून प्रेत उत्तरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले.

.       यावेळी डी बी ठाकरे पी एस आय सचिन खामनकर आणि सहकारी उपस्थित होते. शेंडे यांच्या आकस्मिक निघून जाण्यामुळे मोटेगाव शोकसागरात बुडाला असून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पाश्चात्य पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.