सामाजिक कार्यात अग्रेसर सेवावृतीचा सत्कार

27

विसापुरातील मित्र परिवाराने केले आयोजन 

मान्यवरांनी उलघडला तीस वर्षाचा सेवा काळ

विसापूर : एका शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्याचा मुलगा. जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वासाने शिक्षण घेतो.राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत वाहक म्हणून रुजू होतो.मात्र शिक्षणाची हौस डाक्टरेट पदवी मिळवून पूर्ण करतो.अशातच सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घेतो.अशा या तीस वर्षाच्या सेवाकाळातील सेवावृत्तीच्या सामाजिक कार्यातील अग्रेसर कार्यकर्त्याचा मित्र परिवाराने विसापुरात ह्रदयस्पर्शी सत्कार नुकताच केला.यावेळी मान्यवरांनी त्याच्या जीवन प्रवासातील प्रसंगाला उजाळा दिला.या सत्काराचे मानकरी होते विसापूर येथील डा.सुनील बुटले.

.       बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मित्र परिवार व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या माध्यमातून श्री पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात डॉ. सुनील बुटले व त्यांच्या पत्नी कविता बुटले यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी सतकारमुर्तिला स्मुर्तीचिन्ह, शाल, श्रीफळ व एस. टी. बसची प्रतिकृती प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

.       याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खरवडे,तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे माजी अध्यक्ष पंचशील कुंभारे, सत्कारमुर्ती डॉ.सुनील बुटले, कविता बुटले, मराठा सेवा संघाचे मनोहर माडे, अनिल वाग्दरकर, डॉ.संजय बोधे, चंद्रकांत पावडे, कमल इटनकर, प्रदीप आडकीने यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.

.       यावेळी मान्यवरांनी डॉ. सुनील बुटले यांच्या सेवा कार्याला उजाळा देताना म्हणाले, राज्य परिवहन महामंडळ येथे वाहक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते वाहतूक नियंत्रक झाले. मात्र त्यांच्यातील विद्यार्थी स्वस्त बसला नाही. सेवेत असताना त्यांनी तीन पदव्या प्राप्त केल्या. डाक्टरेट ही त्यात महत्वाची पदवी ठरली. त्यांनी दोन ते तीन पुस्तके लिहून स्वतःला लेखक केले. या सोबतच सामाजिक कार्यात झोकून दिले. अभ्यासिकेच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दालन खुले केले. त्यांच्या हा सामाजिक प्रवास समाजाला प्रेरणादायी आहे, असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक चंद्रकांत पावडे यांनी केले. कार्यक्रमांचे संचालन रितू चानकापुरे व श्रेयश ढवस यांनी आभार मानले.