दीड वर्ष लोटूनही शिवनपायलीच्या नळाला पाणीच नाही

36

जलजीवन मिशन योजना

नागरिकांत पाणीपुरवठा विभागाविरुद्ध असंतोष

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या शिवनपायली येथील पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशन चे काम तब्बल दीड वर्षांपासून सुरू असून अजूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम झालेलेच नाही. तसेच स्विच रूम सुद्धा उपलब्ध झालेली नाही तसेच अजूनपर्यंत नलजोडणीचे काम सुद्धा अपूर्ण असून या नळाला जोडणारी पाईप लाईन सुद्धा झालेली नसल्याने नळाला पाणी येणार की नाही असा प्रश्न गावकऱ्याना पडला असून संथ गतीने सुरू असलेल्या या जलजीवन मिशनच्या कामामुळे याही वर्षी नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांत गावकऱ्यात प्रशासना विरोधात संताप निर्माण झाला असून तात्काळ काम करून गावाला पाणी टंचाई पासून मुक्त करावे आणि तात्काळ काम पूर्ण करून नळाला पाणी द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

.      शिरपूर ग्रा प अंतर्गत येणाऱ्या शिवनपायली येथे मागील दीड वर्षांपूर्वी पासून जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली मात्र या योजनेच्या कामाला धुमडक्यात प्रारंभ झाला परंतु दीड वर्ष लोटूनही अजूनही 50 टक्के सुद्धा काम पूर्ण झाले नाही असे आरोप नागरिकांनी केला असून या कामातील पाण्याच्या टाकीचा अजूनही पत्ता नाही स्विच रूम सुद्धा बनवली गेली नाही गावातील नलजोडणी सुद्धा अपुरी झाली आहे तसेच नदीवरून येणारी पाईपलाईन सुद्धा टाकलेली नाही अजून पर्यंत विहीर खोलीकरण सुद्धा बाकी असल्याने गावकऱ्यात कंत्राटदार व प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाले असून संताप व्यक्त होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे दीड वर्ष होऊनही 50 टक्के काम सुद्धा पूर्ण झाले नाही याबाबत गावकऱ्यांनी कंत्राटदाराला विचारले असता उद्धट उत्तरे दिली जात असल्याने आता दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे सदर काम हे कासवगतीने सुरू असून तीन ते चार कामगार कामावर असतात त्यामुळे काम लांबणीवर गेले असून लवकरच पावसाळ्याला सुरवात होणार आहे.

.      त्यामुळे काम बंद होणार त्यामुळे याही वर्षी पाणी मिळणार नसल्याने नागरिकात संबंधित पाणीपुरवठा विभागा विरुद्ध असंतोष निर्माण झाले आहे तेव्हा संबंधित विभागाने तात्काळ या गँभिर बाबीची दखल घेऊन काम पूर्ण करावे आणि नळाला पाणी द्यावे अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे