मोटार सायकल व घरफोडी प्रकरणातील आरोपीला २४ तासात अटक

50

बल्लारपूर पोलिसांची कारवाई

तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

विसापूर : बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्डातील एक कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते. ही संधी साधून चोरांनी घराचा दरवाजा तोडून घरफोडी केली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा तपास करून मोटार सायकल चोरी व घरफोडी प्रकरणात तीन आरोपीना जेरबंद करण्याची कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे किशोर त्रिसूलवार (२८) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड, तिरुपती दसरवार (२0) रा. गौरक्षण वार्ड व रितिक उपरे (२४) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपूर असे नाव आहे.

.      बल्लारपूर येथील विद्यानगर वार्डातील राजू पिंपळवार हे कुटुंबासोबत ६ जून रोजी देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते. ते देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम पार पाडून ८ जूनला घरी आले.तेव्हा त्यांनी घराचे दार उघडण्यासाठी कुंडी पाहिली. त्यावेळी त्यांना जबर धक्का बसला. घरी घरफोडी करून चोरी झाल्याची तक्रार त्यांनी बल्लारपूर पोलिसात केली. तपासात त्याच्या घरून ११ हजार रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने व अन्य साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.

.      या घटनेचा तपास करण्यासाठी बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी एक पथक तयार करून जलद गतीने तपास करण्याचे निर्देश पथकला दिले. स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाने वेगाने तपास करून तीन आरोपीना २४ तासात जेरबंद करण्याची कारवाई केली. आरोपी कडून एक काळ्या रंगाची मोटार सायकल, एक ग्राम सोन्याचे दागिने, तीन चांदीचे शिक्के असा एकूण तीस हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरक्षक असिफराजा शेख, गजानन डोईफोडे, सुनील कामटकर, संतोष दंडेवार, रणवीजय ठाकूर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, शेखर माथानकर, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम यांच्या पथकाने यश्वी केली.