चिमुरात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप

30

व्हॉइस ऑफ मीडियाचे आयोजन

चंद्रपूर : लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ब्रीद वाक्य घेऊन उभारण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडिया अगदी अल्पवधीतच देश भरात पोहचला. लाखो सदस्य संख्या असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया च्या माध्यमातून पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबा साठी विविध उपक्रम राबविले जात असुन आज दिनांक ११ जुन रोज मंगळवारी चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान सभागृह येथे सकाळी ११ वाजता शैक्षणिक साहित्य वितरण, गुणवंत पाल्याचा अभिनंदन सोहळा व पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरित करण्यात येणार आहे.

.        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व्हॉइस ऑफ मीडियाचे नागपूर तथा राज्य संघटक सुनील कुहिकर हे राहणार आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मुख्य मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून चिमूर चे तहसीलदार श्रीधर राजमाने, चिमूर चे पोलीस निरीक्षक संतोष वाकल, मुख्याधिकारी डॉक्टर सुप्रिया राठोड, वाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नीलम राचलवार यांचे सह अनेक दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.

.        या कार्यक्रमाचे आयोजन वाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा व चिमूर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.