जेतवन बुद्ध विहारात बिरसामुंडा स्मृतीदिन साजरा

27

भिसी : चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

.      जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला धूर्पता वरखडे ललिता वरखडे मारोती बहादुरे ईश्वर वरखडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कोमल मरस्कोल्हे तसेच योगेश मेश्राम यांनी “जननायक भगवान बिरसा मुंडा” यांचे “क्रांती कार्य” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन केले. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले. त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्यासोबत ४६० आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. बिरसा यांनी 1895 मध्ये सामाजिक सुधारणेचे काम हाती घेतले. त्यांनी सर्व आदिवासींना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जंगल, जमीन आणि मालमत्तेच्या हक्कासाठी लढा द्या, जे आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. अशा शब्दात मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

.     या प्रसंगी शेबिका मरस्कोल्हे, जया वरखडे, शितल बहादुरे, प्रियंका वरखडे, दामिनी मरस्कोल्हे, दिव्या वरखडे, समृद्धी वरखडे, वैष्णवी वरखडे, मुन्ना गजभिये, सोहेल कुमरे व गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रदीप मेश्राम यांनी मानले.