अवैध रेती व रेती साठ्यावर महसूल विभागाचे धाड सत्र सुरूच

35

तुळाना येथे १२ ब्रास रेती साठा व ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई

जप्ती केलेला रेती साठा घरकुलधारकांना वाटप

अवैद्य रेती साठाबाजांचे धाबे दणाणले

वरोरा : अवैध रेती तस्कर व साठाबाजां विरोधात वरोरा महसूल विभाग ॲक्शन मोडवर आहे. महिला व पुरुष अधिकारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून दररोज अवैध रेतीची वाहतूक करणारे वाहन आणि रेती साठ्यावर कारवाईचा बडगा उभारून जप्ती केलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित केली जात आहे. तुळाना येथे सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास १२ ब्रास रेती साठा व १ ब्रास रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर धडक कारवाई करण्यात आली. वरोरा महसूल विभागाच्या या दमदार कामगिरीने सामान्य जनता सुखावली आहे.

.        प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले नाही. मात्र डेपो द्वारे रेतीची उचल करता येते. पण अनेकांना रेतीची बुकिंग करता येत नाही. यावरही रेती माफियानी डोळा ठेवत कुणाच्याही नावाने रेतीची बुकिंग करून अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकल्या जात आहे. ही महागडी रेती घरकुल लाभार्थ्यांना घेणे परवडण्यासारखे नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम थंड बस्त्यात पडले आहे. मात्र रेती अभावी घरकुलाचे काम थांबू नये यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेत अवैध रेती तस्कर व साठा बाजावर कारवाई चा सपाटा सुरु केला. वरोरा महसूल विभागाने महिला व पुरुष कर्मचारी अधिकारी यांचे पथक तयार करून दररोज कारवाई करत जप्ती केलेली रेती घरकुल धारकांना मोफत दिल्या जात आहे.

.         सोमवारी पहाटे ५.३० वाजता मौजा तुळाणा येथे महसूल पथकाने सार्वजनिक जागेवर धाड टाकीत 12 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. जप्ती केलेले रेती साठा जामगाव बु येथील राजु मुरलीधर भोयर, शोभा संतोष बोधे, शंकर श्रीहरी ठेंगणे, श्रीनिवास सखारा देहारकर, सुरज नथ्थु मंगाम, विकेक नथ्थु मंगाम, चंद्रकला वासुदेव गंधारे, बंडू वारलु चिकाटे व सुधाकर बापूराव गायकवाड या घरकुल लाभार्थ्यांना, मंडळ अधिकारी, चिनोरा वरोरा, तलाठी, तुळाना, ग्रामसेवक, तुळाणा पोलीस पाटील, तुळाणा कोतवाल, शेंबळ यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आली. तसेच अवैध उत्खनन तपासणी करीता तहसीलदार, वरोरा, दौऱ्यावर असतांना सकाळी 5:30 वाजताचे सुमारास मौजा – तुळाणा गावच्या परिसरा टॅक्ट्रर क्रमांक – MH-34 BR-8819 या वाहनातून 100 घनफुट (1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन संदीप दाते रा. तुळाणा ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद असून सदर ट्रक्टर मालकावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे.