सिंदेवाहीची पायल बनली “पायलट”

68

सिंदेवाही : जिद्द, चिकाटी, धैर्य, माणसाच्या अंगी असले, तर यशाचे शिखर निर्विवाद गाठता येते. याचा प्रत्यय सिंदेवाही येथील पायल वसाके या विद्यार्थिनीने आणून दाखविला असून नुकतीच ती अमेरिका इथून पायलट ” बनून आली असल्याने तालुक्यातील सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

.       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडबोरी येथील शिक्षिका राजश्री वसाके यांची मुलगी पायल वसाके ही अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने तिने भविष्यात वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी तिने १ ते १० पर्यंतचे शिक्षण सिंदेवाही येथील कल्पतरू विद्यामंदिर येथे घेतले. त्यानंतर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी पर्यंत शिक्षण घेऊन मनात वैमानिक बनण्याचा ध्यास असल्याने त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिल्ली येथे प्रवेश घेतला. आणि तिथूनच ती पायलट होण्यासाठी मार्च २०२३ मध्ये अमेरिका येथे गेली. आणि एक वर्षाचे पायलट चे प्रशिक्षण पूर्ण करून नुकतीच ती परत आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खाजगी वैमानिक बनण्याचा पहिला मान पायल हिला मिळाला असून एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची मुलगी पायलट बनली असल्याने सर्वच स्तरातून पायल वसाके हीचे अभिनंदन करण्यात येत आहे.