कुराण शरीफ या प्रवित्र ग्रंथाचा विटंबना करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आरोपीला कठोर शिक्षा द्या

33

राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास महासंघाने पोलिसांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

माजरी : युट्युब वर समीर या नावाने सक्रिय असलेल्या या इसमाकडून मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफचा विटंबनाच्या निषेधार्थ माजरी येथे मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला आहे. आणि राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास महासंघाच्या वतीने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रपतीना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

.       सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ चतुर्वेदी नावाचा एक व्यक्ती, जो माजी मुस्लिम धर्माचा असून समीर या नावाने यूट्यूब वर सक्रिय आहे. सदर व्यक्ती गंगानगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या तलीवाला पाडली गुज्जर, जिल्हा हरिद्वार (उत्तराखंड) या गावाचा मूळ रहिवासी आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी, त्याचे जुने नाव सदाकत अली आहे, तो यापूर्वीचा मुस्लिम धर्माचा असून समीर नावाने युट्युब वर सक्रिय आहे. माजी मुस्लिम नावाने समीर यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह करून पवित्र कुराणची विटंबनाचे कृत्य केले. यादरम्यान समीरने कुराणवर त्याचे जोडे ठेवले आणि कुराण त्याच्या चपलाने घासले. नंतर त्याने कुराणची पाने फाडली आणि जाळली. तसेच अल्लाहबद्दल चुकीच्या शब्दात भाष्य केली. सदर व्यक्ती केवळ या देशातील मुस्लिम समाजाचीच नव्हे तर संपूर्ण जगातील मुस्लिमांची आणि सर्व धर्माच्या अनुयायांची मने दुखावली आहेत. आपल्या देशाचे संविधान कोणत्याही जाती धर्माबद्दल कोणालाही बोलण्याची परवानगी देत ​​नाही. आणि कोणताही धर्म किंवा धर्मग्रंथ व धार्मिक गुरूंबद्दल चुकीच्या टिप्पण्या करण्यास परवानगी देत ​​नाही.

.       अश्या घटनांमुळे शांतता आणि सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होतो. मुस्लिम समाज अशी लज्जास्पद घटना आणि अपमान कोणत्याही किंमतीत सहन करू शकत नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. या धर्माध व्यक्तीने केलेल्या कृतीमुळे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ यांची विटंबना होऊन संपूर्ण जगातील मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेच पोहचली आहे. संबंधित इसमावर कडक कारवाई करण्याची मागणी अशा आशयाचे निवेदन शनिवारी माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांना पाठविण्यात आले आहे.

.       यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशरफ खान, नूरी जामा मस्जिदचे सदर असलम बेग, गुलशन- ए – मदीना मस्जिदचे इमाम मौलाना खिज्र हुसैन, मेहमूद भाई, इखलाख सिद्दीकी , इस्तेयक सिद्दीकी, मोहसिन खान, नूरी मस्जिद दफाई नं. १ चे इमाम मौलाना रजवी यांच्यासह माजरीतील शेकड़ों मुस्लिम बांधव उपस्थित होते.