डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील स्नेहलचे नीट परीक्षेत यश

35

ब्रम्हपुरी : वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल भारतीय स्तरावर आयोजित नीट परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील स्नेहल विनोद झोडगे हिने नीट परीक्षेत यश संपादन केले आहे. तिने परीक्षेत ७२० पैकी ५९४ गुण प्राप्त केले आहे. ती कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा आयटक राज्य सचिव विनोद झोडगे यांची मुलगी असून स्नेहल हिने दहावी मध्ये ९६ टक्के तर बारावी ८९ मध्ये टक्के घेऊन उतीर्ण झाली होती.

.          तिच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्दा अभिनंदन केले. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. ड्रॉ. महेश कोपुलवार, रिपब्लिकन पक्ष खोरीपा शहर शाखेचे अध्यक्ष प्रशांत डांगे, महाराष्ट्र सरचिटणीस जीवन बागडे, तालुका अध्यक्ष नरेश रामटेके, पद्माकर रामटेके, तसेच देवराव चवळे, अँड जगदीश मेश्राम, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे, मिलिंद भन्नारे, सूरज शेंडे यांनी स्नेहल चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील मावशी तसेच गुरुजनांना दिले.