बोगस बियाण्यामुळे होत असलेली शेतक-यांची फसवणुक थांबवा – डॉ. अंकुश आगलावे

54

 

वरोरा :-

.               बोगस बियाण्यामुळे होत असलेली शेतक-यांची फसवणुक थांबविण्यासाठी केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी . जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देवून मागणी केलेली आहे.

.               वरोरा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात रासायनिक खते, किटननाशके बीटी कापूस बियाणे आणि खरीप हंगामातील इतर बियाणी कंपन्यांकडून खरेदी होत आहेत. यापूर्वी मागील वर्षीपर्यंत घडलेले प्रकार पाहता, या बियाण्याची तपासणी होणे आवश्यक आहे.

.             या करीता भरारी पथके स्थापन करून यंत्रणा सजग राहिल्यास शेतक-यांचे नुकसान टळणार आहे. यासाठी प्रशासनाने एक पाऊल उचलून बोगस बियाण्यांना आळा घालण्याची मागणी डॉ. आगलावे यांनी केली .

.                अनेका बियाणे उगवत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतक-यांवर ओढवून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मागील वर्षी सोयाबीन, बीटी कापूस उगवला नसल्याच्या घटना ग्रामीण भागात घडल्या आहे.