विविध जिल्ह्यातील शेकडो गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

37

नेचर फाउंडेशन चा उपक्रम

चिमूर : नेचर फाउंडेशन नागपूर द्वारा नुकताच दहावी व बारावी चा निकाल लागल्यानंतर गुणवत्ता प्राप्त चंद्रपूर, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील विविध चिमूर, वरोरा, भद्रावती, समुद्रपूर, भिवापूर, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यातील 75 % पेक्षा जास्त दहावी व बारावी मध्ये टक्के घेणाऱ्या तसेच शासकीय सेवेत निवड, देशांतील नामांकित विद्यापीठात निवड व समाजसेवा म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचा एक फळाचे रोपटं, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन नेचर फाउंडेशन च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

.       या कार्यक्रमाचे अध्यक्ष कपिल खोब्रागडे (शिक्षक) उदघाटक रागिनी कामडी (कर सह्ययक), प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ थुटे (भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष), मणी रॉय, मोनू बनसोड, विक्की कोरेकर तर सत्कारमूर्ती व मार्गदर्शक म्हणून निलेश नन्नावरे (सचिव नेचर फाउंडेशन), अश्विनी नन्नावरे (प्रथम फाउंडेशन) अमोल कावरे (नेचर फाउंडेशन) आशिष जीवतोडे, अमोल देवगिरकर (माई फाउंडेशन), शुभम पसारकर (दिव्यवंदना आधार फाउंडेशन) लोमेश मेश्राम, साहिल पाटील (BA फर्ग्युसन कॉलेज,पुणे) समीक्षा नन्नावरे (MA आय.आय.टी हैद्राबाद) पूजा चाफले (अझीम प्रेमजी विद्यापीठ,बंगळुरू) वनश्री जीवतोडे (शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई) या सर्वानी विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त इतर संधी यावर मार्गदर्शन केले.

.       चिमूर सारख्या ग्रामिण भागांतील विद्यार्थी देश इकडे स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मात्र पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील नामांकित विद्यापिठात शिक्षण घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम चिमूर तालुका जवळील सात तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आला होता. सोबत पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्व सत्कारमूर्तीना एक फळांची रोपटं भेट देऊन एक अनोखा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. अशा प्रकारे उपक्रम राबविण्यात येणारे नेचर फाउंडेशन राज्यांतील पहीली संस्था आहे. या कार्यक्रमाकरिता विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गुंजन सावसाकडे व आभार प्रदर्शन अस्मिता ढोणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेचर फाउंडेशनचे सर्व विद्यार्थी टीम ने सहकार्य केले.

“आपल्याला भविष्यकालीन शाश्वत विकास हवा असेल तर किमान एक रोपटं एका वर्षात एका व्यक्तीने लावायचे आहे. प्रत्येकाने एक रोपटं लावून त्याचे संगोपन प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि निष्ठापूर्वक करून शाश्वत विकास निर्माण करण्यारिता सत्कारमूर्तीना एक रोपटं देऊन सत्कार करण्यात आला.                                                                                                                                                                                                                                         निलेश नन्नावरे                                                           (नेचर फाउंडेशन संस्थापक)