शेताच्या मधोमध पडलेले पोल जैसे थे ! नव्या पोल ची उभारणी

146

वीज वितरण कंपनी चा प्रताप

पोल हटविण्यासाठी शेतकऱ्याची पायपीट

हंगाम तोंडावर शेतीची मशागत करायची कशी

भद्रावती : काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळ वाऱ्याने शेतातील विद्युत खांब जमीनदोस्त झाले तर कुठे अर्द्यातूनच वाकले. वीज वितरण कंपनीने वाकलेले खांब जैसे थे ठेवले आणि नव्या पोल ची उभारणी केली. वाकलेल्या पोल मुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करने कठीण झाले आहे. वीज वितरण कंपनीला लेखी तक्रार दिली मात्र वीज वितरण कंपनी चे अभियंता शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. ऐन हंगाम तोंडावर आला. पोल मुळे शेतीची मशागत करायची कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यां समोर ठाकला आहे.

.        भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी हर्षित प्रमोद जिवतोडे, कुणाल शंकर जीवतोडे, रितेश प्रवीण जीवतोडे यांची मौजा विसलोन येथे शेतजमीन असुन त्यांचा भु.क. 141/1, 141/2 व 141/3 एकुण क्षेत्रफळ 0.1 हे. आर, 0.81 हे. आर व 1.21 हे. आर प्रमाणे शेतजमीन आहे. या शेतजमीनीमध्ये विद्युत वाहीनी खांब (इलेक्ट्रीक पोल) टाकलेले होते. परंतु ते पोल मुसळधार पावसामुळे व वाराघुनीमुळे पुर्णपणे पडलेले आहे. मात्र वीज वितरण कंपनी भद्रावती च्या अभियंत्याने पडलेले पोल उचलण्या ऐवजी त्या ठिकाणी दुसरे नविन पोल उभारलेले आहे. वाराधुनिमुळे पडलेले जुने इलेक्ट्रीक पोल हे हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचन निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनी भद्रावती च्या प्रतापाने शेतकऱ्यांना शेती ची मशागत करने कठीण झाले याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला एक महिन्या अगोदर लेखी तक्रार दिली. व सदर अभियंत्याला मोबाईल द्वारे दररोज सांगण्यात येत असतानाही अधिकारी शेतकऱ्यांना हुलकावणी देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज वितरण कंपनीच्या या हेकेखोरपणा मुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहे.