प्राचार्य प्रीतमदास सोनारकर यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार

49

वरोरा : भारत शिक्षण संस्था वरोरा द्वारा संचालित भारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चारगाव (खुर्द) चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रीतमदास सोनारकर यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.

.        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया तर प्रमुख पाहुणे म्हणून शाम लोया, रामबाबू लोया, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोनेकर, आबाजी देवाळकर, कळसकर, रघुनाथ मिसाळ, शंकर भेले, प्रदिप भले व परेलवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विचार मंचावर चारगाव खुर्द चे सरपंच राजू चिकटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजु गोडघाटे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप बोधाणे आणि भारत विद्यालय मुलांचे वस्तीगृह चे माजी अधीक्षक वसंतराव पावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ लिपिक अभय धोबे यांनी केले. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती यांच्या परिचय करून देताना अनिल गजभे यांनी प्राचार्य सोनारकर यांची एकंदरीत 35 वर्षाची सेवा करीत असताना कार्याप्रति असलेली कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि कर्मचाऱ्याप्रती असणारी सहकार्याची व प्रेमाची भावना यांचा आवर्जून उल्लेख केला. सोनारकर यांनी याच भारत विद्यालयातून 13 ऑक्टोबर 1989 ला सेवेचा प्रारंभ केलेला असून त्यांची सेवानिवृत्तीही याच विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून होत आहे हे कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला.

.          या सेवा काळात सोनारकर यांनी परीक्षा विभाग प्रमुख पर्यवेक्षक तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील गणित विषयाचे विषय तज्ञ म्हणून कार्यही केले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर दिलीप जुनारकर आणि संच यांनी स्वागत गीत आणि सत्कार गीतही सादर केले. त्यानंतर भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया, राम लोया आणि श्याम लोया सदस्य यांचे हस्ते प्राचार्य प्रीतमदास सोनारकर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

.          यानंतर विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी भारत विद्यालय चारगाव खुर्द मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदावर केलेल्या उल्लेखनीय कार्य व सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन भारत शिक्षण संस्था व भारत विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ही प्रेरणा सुद्धा मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक सोनारकर यांच्या कल्पनेतूनच समोर आली. सोबतच भारत विद्यालय मुलांचे वस्तीगृह चे सेवानिवृत्त अधीक्षक वसंतराव पावडे यांचाही सत्कार व सन्मान करण्यात आला.