सरकार ग्रुपतर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे जंगी स्वागत

121

वरोरा : येथील सरकार ग्रुपचे अध्यक्ष कासिफ खान यांच्या वतीने बुधवार ५ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास रत्नामला चौकामध्ये घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

.       चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाप्रित्यर्थ भव्य रॅलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. रात्री ८ वाजता नागपूर टप्पा येथील रत्नमाला चौकात आगमन होताच सरकार ग्रुपचे अध्यक्ष कासिफ खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

.       यावेळी रस्त्याच्या दुतर्फा १२ जेसीबी लावण्यात आल्या होत्या. त्यातून गुलाब पुष्पांची उधळण खासदार धानोरकर यांच्यावर करण्यात आली. तसेच ६० किलो वजन असलेला गुलाब पुष्पांचा ५० फूट लांबी आणि दोन फूट जाडीचा हार त्यांच्या स्वागताकरिता बनविण्यात आला होता. याप्रसंगी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. यावेळी प्रवीण काकडे, नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची मानस व पार्थ ही दोन्ही मुले उपस्थित होती.