घरकुलाची थकीत रक्कम लाभार्थ्यांना त्वरित वितरित करा

49

राजू चिकटे यांची मागणी

वरोरा : तालुक्यात घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या थकीत हफ्त्याची रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी. अशी मागणी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा ग्राम संवाद सरपंच संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजू चिकटे यांनी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. वरोरा पंचायत समिती अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतून ६१० घरकुल मंजूर असून जवळपास ३५० लाभार्थांनी बांधकामास सुरुवात केली. प्रारंभी रेतीअभावी अर्धवट असलेली घरकुलाची थकीत रक्कम घरकुलांची बांधकामे आता अंतिम टण्यात आलेली आहे.

.          तर अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम वेगवेगळ्या टप्प्यात आहे. काही दिवसातच पावसाळा सुरू होत आहे. असे असताना मंजूर अनुदानाचा टप्पा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे घरकुलांची बांधकामे थांबली आहे. परिणामी घरकुल लाभार्थी आर्थिक विवचनेत सापडला आहे. यापैकी अनेक लाभार्थ्यांना अधिक भावाने रेती खरेदी करावी लागत असल्याने त्यांना आधीच आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा घरकुल लाभार्थ्यांची अडचण आणि गरज लक्षात घेता त्यांना त्यांच्या थकीत हफ्त्याची रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा ग्राम संवाद संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र चिकटे यांनी संवर्ग विकास अधिकारी मुंडनकर यांच्याकडे केली आहे.