वृक्षारोपण करून नंदोरी टोल प्लाझा येथे पर्यावरण दिन साजरा

62

चंद्रपुर :  चंद्रपुर नागपुर महामार्गावरील नंदोरी टोल प्लाझा येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त वरोरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून टोल कर्मचार्‍यांना पर्यावरण संवर्धन विषयी माहिती देत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.         जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नंदोरी टोल प्लाझा येथे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अमोल काचोरे हे होते. काचोरे यांनी यावेळी विविध जातीच्या वृक्षाचे रोपन करण्यात आले.

.         याप्रसंगी ठाणेदार अमोल काचोरे यांनी टोल कर्मचार्‍यांना पर्यावरण संवर्धन विषयी माहिती दिली. यावेळी टोल चे व्यवस्थापक प्रवीण चोरे व टोल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.