नैसर्गिक आपत्तीमुळे तुटलेल्या विज वाहिन्या तात्काळ दुरुस्त करा

36

शेतकर्‍यांचे कार्यकारी अभियंताला निवेदन

वरोरा : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे वरोरा तालुक्यातील शेतातील विद्युत पोल व विज  वाहिन्या शेताच्या मधोमध कोलमडुन पडल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची मशागत करणे कठीण झाले असून पावसाळ्यापूर्वी विद्युत पोल व विज वाहिन्या तात्काळ दुरुस्त कराव्या अश्या मागणीचे निवेदन विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे व शेतकर्‍यांनी दिले.

.        वरोरा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व सुसाट वार्‍याने शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे विद्युत पोल व विज वाहिन्या शेतकर्‍यांच्या शेतात पडल्या आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची मशागत करणे कठीण झाले आहे. याबाबत विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. मात्र आठ ते दहा दिवस होऊनही विज वितरण कंपनीने विद्युत वाहिन्या जोडल्या नाही. परिणामी शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बी-बियाणे घेऊन पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र विज वितरण कंपनीच्या हेकेखोरी धोरणामुळे विद्युन पोल व विद्युत वाहिन्या जश्याच्या तश्याच आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील शेतकर्‍यांनी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय गाठून कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत वीज वितरण कंपनी चंद्रपूर चे अधीक्षक अभियंता यांना निवेदन पाठविण्यात आले.

.        आज 7 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजा पेरणी करण्यासाठी सज्ज झाला. मात्र पाऊस कधी हुलकावणी देईल हे मात्र सांगता येत नाही त्यामुळे  शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी विजेची कधी ही गरज पडू शकतात, यामुळे शेतातील कृषी ट्रान्सफॉर्मर, तुटलेल्या विज जोडण्या, आणि मोडलेले पोल येत्या आठ दिवसात दुरुस्त करून देण्यात यावे. अन्यथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांना घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे सह शेतकरी अविनाश पावडे, अण्णाजी देवगडे, अनिल डुकरे, अनिल बदकी, मोरेश्वर डुकरे, संदीप वासेकर, लीलाधर दातारकर, मनोज चौधरी, प्रसाद मिलमिले सह वरोरा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.