विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विलास अंबादे यांचा सेवानिवृत्ती निरोप

29

भद्रावती : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विलास अंबादे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बँकेच्या शाखेत पार पडला.

.       यावेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक महादेव राणे, बँकेचे खातेदार दिलीप ठेंगे, राजू गैनवार, अजय रामटेके उपस्थित होते. अंबादे यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यांनी बँकेला दिलेल्या ४० वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दी बद्दल राणे यांनी त्यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

.        रुजू झालेले शाखा व्यवस्थापक अमोल कथाले, चेतन पाचभाई, रजत इटणकर, किसन दूधबळे, कल्याणी ठाकरे उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या कार्यकाळाला उजाळा देऊन शुभेच्छा दिल्या.